क्रोश्याचे मुलभूत टाके

क्रोश्याच्या टाक्यांची उंची हि त्यांची विविधता ठरवितात.  उंचीनुसार खालील प्रकारचे टाके असतात.

 • साखळी
 • स्लिप टाका किंवा सुर टाका.
 • सिंगल क्रोशे किंवा छोटा खांब, मुका खांब, बिन आढीचा खांब
 • हाफ डबल क्रोशे किंवा अर्धा खांब
 • डबल क्रोशे किंवा ख़ांब
 • ट्रेबल क्रोशे किंवा मोठा खांब
 • डबल ट्रेबल क्रोशे उंच खांब
 • फ़्रंट पोस्ट क्रोशे
 • बॅक पोस्ट क्रोशे
 • पाया साखळी
  •  मुक्या खांबाची पाया साखळी
  • अर्ध्या खांबाची पाया साखळी
  • खांबाची पाया साखळी

टाक्यांची उंची :

प्रत्येक टाक्याला विशिष्ठ उंची असते व ती साखळीच्या मापाने मोजली जाते.

उदा. मुक्या खांबाची उंची हि एका साखळी एवढी असते तर खांबाची उंची हि ३ साखळ्यां एवढी असते.

टाक्यांचा तक्ता :

 

खालील तक्यात टाक्यांचे मराठी व इंग्रजी नावे,  संक्षिप्त नाव, चित्रखूण, उंची याची माहिती दिली आहे. हा तक्ता समजून घेतल्यास क्रोशे करणे सोपे नक्कीच होइल.

 

क्रमांक मराठी नाव इंग्रजी नाव संक्षिप्त नाव चित्र खूण उंची
१. साखळी Chain Stitch ch
२. सुर टाका Slip Stitch ss
३. छोटा खांब, मुका खांब, बिन आढीचा खांब Single Crochet sc  किव्हा

४. अर्धा खांब Half Double Crochet hdc
५. खांब Double Crochet dc
६. मोठा खांब Treble Crochet tr
७. उंच खांब Double Treble Crochet dtr  
८. पुढचा खांब Front Post Crochet  fpdc 3
९. मागचा खांब Back post Crochet bpdc 3

मागचा आणि पुढचा टाका घालण्यासाठी टाक्यास काहि उंची असावी लागते. खांब, मोठा खांब आणि उंच खांब या टाक्यांना उंची असल्याने, मागचा आणि पुढचा टाका उठून दिसतो.

आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंदच होइल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *