बियांच्या रचनेची कानपट्टी

थंडीच्या दिवसांमध्ये स्त्रीयांना कान आणि डोके थंडगार वार्‍यापासून तर वाचवायचे असतातच पण सतत तीच तीच टोपी अथवा नेहमीच काय टोपी घालायची असे वाटत असते. आणि म्हणूनच आपण विविध रंगाच्या आणि विविध ढंगाच्या टोप्या किंवा आपली केशरचना विसकडू नये म्हणून अश्या प्रकारची कानपट्टी वापरायला हरकत नाही.

आपल्या  ड्रेसच्या रंगाला साजेशी अशी एक कानपट्टी तुम्ही स्वतः आता विणू शकता. ही रचना अगदी सोपी आहे आणि प्रत्येक ओळ कशी विणायची ते इथे मी सांगितली आहे. नव्याने विणकाम शिकत असाल तर हा  प्रकल्प नक्कीच हाती घ्यायला सोपा आणि उपयुक्त आहे.

या संपूर्ण रचनेला कसे विणायचे याचा विडियो यूट्यूबच्या VINKAM-GYAN या आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक : https://www.youtube.com/watch?v=BcTg390PyO4

या रचनेपासून मी एक नवी सुरुवात करत आहे. संपूर्णपणे मराठीत लिहून पब्लिश केलेली ही माझी पहिली रचना आहे. मराठीमधून विणकाम शिकविणारी आणि रचना असलेली काही पुस्तके माझ्या वाचनात आली. पण खूप सोप्या आणि अतिशय कमी रचनात्मक शब्दात मराठीत विणकामाचे साहित्य अजूनपर्यंत तरी नाही.

संक्षिप्त शब्द मी नव्याने निर्माण करत आहे. इंग्रजीमध्ये विणकामाची अशी एक खास भाषा आहे त्याच धरतीवर मराठीतूनही विणकामाच्या रचना लिहिता यावा, असा माझा मानस आहे.

बियांच्या कानपट्टीची रचना मराठीतून हवी असल्यास त्याची PDF फाइलची लिंक इथे देत आहे. बियांच्या डिझाईनच्या कानपट्टीची रचना

चला विणू या ….

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *