क्रोशे हा विणकामाचा एक प्रकार आहे. या प्रकारामधे क्रोशे हूक वापरले जाते. क्रोशे हा फ्रेंच शब्द आहे. याचा इंग्रजी अर्थ हूक असा होतो. हूक म्हणजे आकडा. खाली दिलेल्या चित्रामधे क्रोशे हूक दाखविले आहे. 

क्रोशे हुक आकृती- धागा आकड्यात अडकतो

क्रोशे हुक आणि त्याबद्दलच्या इतर माहिती साथी इथे क्लिक करा.

या आकड्यामधे धागा अडकतो आणि तो धागा सुईवर असलेल्या टाक्यामधून बाहेर काढता येतो. हा नविन टाका. अश्याप्रकारे क्रोशेच्या विणकामामधे एका वेळी एकच टाका सजीव असतो. याविरुद्ध दोन सुयांच्या विणकामामधे व हातमागाच्या विणकामामधे एक किंवा अनेक टाके एकाच वेळी सजीव असू शकतात.

क्रोशेचे काम सुरु करण्यापूर्वी लोकर किःवा धागा याला सरकती गाठ (स्लिप नॉट) घालून घ्यायची असते. ती काशी घालायची आणि त्या संबंधीची माहितीसाथी इथे क्लिक करा.

क्रोशे शिकण्यास सुरूवात करताना काही मूलभूत टाके माहित करुन घेणे आणि त्यांचा सराव करणे फायद्याचे ठरते. क्रोश्याच्या मूलभूत टक्यांची माहिती या पोस्ट वर सविस्तर दिलेली आहे. शिवाय टाक्यांच्या चिन्हांचा तक्ता देखील इथे दिलेला आहे.